विडणी (योगेश निकाळजे) -ISPL(इंडियन स्ट्रीट प्रिमियर लिग) हि टेनिस बॉल क्रिकेट मधील भारतातील सर्वांत मोठी लिग स्पर्धा येत्या मार्च मध्ये होणार असून या स्पर्धेमध्ये विडणीचा मंगेश अभंग याची लिलाव प्रणालीसाठी निवड करण्यात आली आहे.
या लिगमध्ये भारतीय माजी क्रिकेट कोच रवी शास्त्री, अमोल काळे यांचा समावेश आहे ,यामध्ये अमिताभ बच्चन यांनी मुंबई संघ, हृतिक रोशन यांनी बेंगलोरू संघ, रामचरण यांनी हैदराबाद, अक्षय कुमार यांनी श्रीनगर संघ, सैफ अली खान व करीना कपूर यांनी कोलकाता संघ तर सुरीया यांनी चेन्नई संघ विकत घेतला आहे. हे सर्व मोठे स्टार्स स्वतःच्या टिम साठी प्लेअर्स खरेदी करणार आहेत ,आणि या टूर्नामेट ची IPL च्या धर्तीवर बोली लागणार आहे आणि या स्पर्धेत लाखो खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता त्यांची गोल्डन तिकीट देऊन ट्रायल घेण्यात आलेली होती त्यामधून सिलेक्ट झालेल्या प्लेअर्सला ग्रीन तिकीट मिळाले व त्यांची फायनल ट्रायल घेण्यात आली व त्यामधून फक्त ३५० प्लेअर्स सिलेक्ट करण्यात आले व त्यांना ब्ल्यू तिकीट देण्यात आले आहे.
मंगेश अभंग यांची प्रथम ट्रायल २४ जानेवारी रोजी सणग्लो स्टेडियम पुणे या ठिकाणी झाली व फायनल ट्रायल ३० जानेवारी रोजी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट क्लब बांद्रा (BKC) मुंबई या ठिकाणी झाली. व त्यांची निलाव प्रणालीसाठी ३५० खेळाडूंमध्ये निवड करण्यात आलेली आहे.
सातारा जिल्ह्यातून विडणी गावचे मंगेश हरिदास अभंग व साताऱ्यातील भूषण गोळे या दोघांची निवड झाली आहे फलटण तालुक्यातील विडणी गावचे सुपुत्र आणि फलटण टेनिस क्रिकेटचा सर्वांत जबरदस्त आणि यशस्वी गोलंदाज असणारा मंगेश हरिदास अभंग यांची निवड झाली आहे
या निवडी बदल तसेच विडणी गावाचे नाव आपल्या खेळातून क्रिकेट खेळामधून भारतामध्ये केल्याबदल मंगेश अभंग यांचे विडणी गावातील संपूर्ण ग्रामस्थ मित्रपरिवार तसेच तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले असून त्यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.