फलटण चौफेर दि ७
राजुरी तालुका फलटण गावाच्या हद्दीत पुणे पंढरपूर रस्त्यावर दीप गार्डन समोर दिनांक ५रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भरधाव एसटीने ऊस वाहतुकीसाठी बैलगाडीला दिलेल्या धडकेत एका बैलांसह बैलगाडा चालक चालकाचा जागीच मृत्यू झाल्याचे दुर्दैवी घटना घडली आहे याबाबत एसटी चालक भाऊसाहेब श्रीमंत नवत्रे वय ४४ रा रड्डे ता मंगळवेढा याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, दिनांक ५ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास पुणे पंढरपूर रस्त्यावर राजुरी गावाच्या हद्दीत दीपक गार्डन समोर एसटी चालक भाऊसाहेब श्रीमंत नवत्रे यांनी त्याच्या ताब्यातील एसटी क्रमांक एम एच १४ बीटी ३३५९ रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरगाव वेगात चालवून बैलगाडीला पाठीमागून जोराची धडक दिली यामध्ये एका बैलासह बैलगाडी चालक सोनू अभिमन्यू सोनवणे वय ३१ राहणार बोधवड तालुका भुसावळ जिल्हा जळगाव याचा जागीच मृत्यू झाला याबाबतची फिर्याद वैभव गावडे राहणार राजुरी यांनी दिली असून यांनी दिली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत