फलटण चौफेर दि २३
कत्तलीसाठी माण तालुक्यातून फलटणच्या कत्तलखाण्यासाठी १९ जनावरांची वाहतूक करणाऱ्यावर दहिवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून शाहीद रशीद कुरेशी (रा. मंगळवार पेठ, कुरेशी नगर, फलटण) याला अटक केली आहे पोलिसांनी सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे गोंदवले रोडवरून पिकअप (क्र. एम. एच.११ ए. जी. ७१४४) मधून वासरे आणि रेडके भरून कत्तलखाण्यात घेऊन चालले होते. याबाबत विडणी येथील शरद गाडे यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.