Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या निधनाने दिलदार मित्र गमावला-श्रीमंत रामराजे



फलटण चौफेर दि २३

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी सर यांच्या निधनामुळे माझ्या व्यक्तिगत व सार्वजनिक आयुष्यातला चांगला व दिलदार मित्र गमावला आहे. उच्चविद्याविभूषित, सुसंस्कृत आणि वक्तृत्वाने परिपूर्ण असणारे मनोहर जोशी हे महाराष्ट्रातील एक व्यासंगी व्यक्तिमत्व होते. कृष्णा खोरे विकास महामंडळाची निर्मिती मी करू शकलो ते मनोहर जोशी होते म्हणूनच. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कृष्णा खोऱ्याच्या निर्मितीची महती पटवून देण्यात मनोहर पंतांनी केलेली शिष्टाई मी विसरू शकणार नाही. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत कृष्णा खोऱ्याची निर्मिती झाली. आज दुष्काळी भागामध्ये सर्वत्र पाणी पोहोचत आहे त्याचे बरेचसे श्रेय मनोहर जोशी यांच्या दूरदृष्टी व सहकार्याच्या भावनेला जाते अशा शब्दात विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.