विडणी - (योगेश निकाळजे ) - केंद्रशासन व महाराष्ट्र शासनामार्फत महिलांसाठी विविध योजना असून या योजनांचा लाभ ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहचवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे आश्वासन जिल्हा परिषद माजी सदस्या जिजामाला नाईक - निंबाळकर यांनी केले
विडणी गावचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा यांच्या अंतर्गत ज्ञानज्योती लोक संचालित साधन केंद्र फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने विडणी व पंचक्रोशीतील महिलांसाठी हळदी कुंकू व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिजामाला नाईक निंबाळकर बोलत होत्या यावेळी साधन केंद्राच्या व्यवस्थापक सौ.रेश्मा मोरे,अध्यक्षा सौ.सुवर्णा नाळे,डॉॅ. सौ.नयन शेंडे, ग्रामपंचायत सदस्या सौ.लता अभंग,सौ.जयश्री शिंदे,सौ.मनिषा नाळे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले व विविध स्पर्धाही घेण्यात आल्या विजेत्या स्पर्धाकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पैठणी व वाण देण्यात आला तसेच महिलांचे मोफत डोळे तपासणी व विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांना आयोजकांच्यावतीने भेटवस्तू देण्यात आल्या कार्यक्रमास सर्व संयोगिनी प्रेरक यांनी परिश्रम घेतले, सुत्रसंचलन सौ.शुभांगी धुमाळ यांनी तर आभार सरपंच सागर अभंग यांनी मानले,कार्यक्रमास बहुसंख्येने महिलावर्ग उपस्थित होता.