साखरवाडी(गणेश पवार)
एकीव ता. जावली येथील धबधब्या जवळ दि १६ रोजी दुपारी ४.४५ वाजण्याच्या सुमारास 5 अनोळखी इसमांनी दोन जणांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून, त्यांना धबधब्याच्या दरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली होती यामध्ये बसप्पाचीवाडी व करंजे पेठ येथील अक्षय अंबावले व गणेश फडतरे यांचा मृत्यू झाला होता याबाबत खुनाची तक्रार मेढा पोलीस स्थानकात दाखल झाली होती स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक तयार करून अवघ्या ७२ तासात तीन संशयतांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित आसिफ मज्जिद शेख( वय २२ वर्षे),निखील राजेंद्र कोळेकर (वय २३ वर्षे), साहिल मेहबूब शेख (वय १८ वर्षे)सर्व रा. भिमाबाई आंबेडकरनगर सदरबझार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत अधिक माहिती अशी रविवार दिनांक १६ रोजी एकीव धबधब्या जवळ काही इसमांची आपसात किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती यामध्ये दोन इसम 700 ते 800 फूट खोलदरीत पडल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले होते तपास पथकाने सर्वप्रथम गुन्हयाच्या घटनास्थळी भेट देवून, घटनास्थळावरील आजूबाजूचे साक्षीदारांच्याकडे विचारपूस केली. तांत्रिक विश्लेषन तसेच एकीव ते सातारा मार्गावरील सी. सी. टी. व्ही. फुटेजची पाहणी केली. पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व त्यांच्या पथकाने संशईत ३ इसमांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी मयत दोन इसम व त्यांच्यामध्ये झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरुन दोन्ही इसमांना मारहाण करुन दरीमध्ये ढकलून दिले असल्याचे सांगितल्याने सदरचा दुहेरी खुनाचा गुन्हा ७२ तासाचे आत उघडकीस आला असून नमुद तीनही इसमांना पुढील कार्यवाहीकामी मेढा पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाईमध्ये समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब भालचिम उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई, अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, संतोष तासगांवकर मेढा पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि, रविंद्र भोरे, विश्वास शिंगाडे, पोउनि अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, सचिन साळुंखे, प्रविण फडतरे, सनी आवटे, राकेश खांडके, हसन तडवी, अमित झेंडे, अजय जाधव, अमित माने, अविनाश चव्हाण, मनोज जाधव, राजू कांबळे, गणेश कापरे, स्वप्नील कुंभार, ओमकार यादव, मोहन पवार, प्रविण कांबळे, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सावंत, पृथ्वीराज जाधव, शिवाजी गुरव, अमृत करपे मेढा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार विकास गंगावणे, दत्तात्रय शिंदे, संभाजी बाबर, सनी काळे, दिगंबर माने, अभिजीत वाघमाळे, प्रदिप उदागे, निलेश देशमुख, गणेश घोरपडे, वाई पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती स्नेहल सोमदे, श्रावण राठोड, प्रेमजित शिर्के, प्रशांत ठोंबरे यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
