Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साखरवाडी विद्यालयात विध्यार्थी गुणगौरव व वृक्षारोपण समारंभ संपन्न 202319

 


साखरवाडी(गणेश पवार) 

   साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात विध्यार्थी गुणगौरव आणि वृक्षारोपण समारंभ नुकताच संपन्न झाला . साखरवाडी मित्रमंडळ -पुणे या संस्थेच्या माध्यमातून साखरवाडी विद्यालयातील दहावी शालांत परीक्षेत उत्तीर्ण गुणांनुक्रमे पहिल्या ७ विदयार्थ्यांना भरीव रोख रकमेची पारितोषिके देऊन दरवर्षी सन्मानित केले जाते.याही वर्षी  जान्हवी सरगर , वैष्णवी मामडाल , ओम बोन्द्रे , श्रावणी घाडगे , रेणुका भोसले , आदित्य भोसले आणि दर्शन रणनवरे या विध्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले .                                   याच कार्यक्रमात विद्यालयातील काही विद्यार्थी - विद्यार्थिनीना शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून शालेय गणवेश वाटप करण्यात आले .शाळेचे १९८४ सालच्या १० वी बॅच चे माजी विद्यार्थी  प्रकाश दत्तात्रय खोत ( सध्या - अमेरिकेत) यांनी यासाठी भरीव आर्थिक सहकार्य केले . त्याबरोबरच  अरविंद किंकर , हरिष गायकवाड , विकी माने , दिलीप पवार , जितेंद्र साळुंखे पाटील आणि श्री फारुखभाई शाह कादरी चिस्ती यांनी यथाशक्ती मदत केली .विद्यालयातील सहाय्यक शिक्षक श्री हरिदास सावंत यांनी याकामी विशेष परिश्रम घेतले .                       ' मंथन ' या स्पर्धा परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेले विध्यार्थी अनुक्रमे प्रशम दोशी , चैत्रा

ली निकाळजे , मयूर भोसले आणि अर्णव नलवडे तसेच मार्गदर्शक शिक्षिका  दीप्ती भोसले यांनाही सन्मानित करण्यात आले  या कार्यक्रमानंतर दावत ए इस्लामी जी एन आर एफ  फौंडेशनच्या सहकार्याने शालेय परिसरात ५० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले .विद्यार्थ्यांना झाडे लावा , झाडे जगवा हा संदेश देण्यात आला !              साखरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ रेखाताई जाधव यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी साखरवाडी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ उर्मिलाताई जगदाळे , पर्यवेक्षक श्री बागडे सर , महंत परमपूज्य हजरत फारुखभाई शाह कादरी चिस्ती , हजरत इर्शाद अत्तरी , समीर अत्तरी , जुबेरभाई पठाण , शौकतशेठ कच्छी , मंगाभाई शेख , तसेच जी एन आर एफ  फौंडेशनचे अनेक सहकारी , शिक्षक बंधू भगिनी , पालक व विध्यार्थी उपस्थित होते .आपल्या स्वागत व प्रास्ताविकात  सावंत सरांनी सर्वांचे स्वागत करून शाळेच्या चौफेर सर्वांगीण प्रगतीचा आढावा घेतला ! सर्वांना चहापान करून कार्यक्रमाची सांगता झाली !

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.