साखरवाडी गणेश पवार
फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पीक पाहणी मोबाईल ॲपच्या साह्याने करून घ्यावी असे आवाहन फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी धुमाळवाडी ता फलटण येथे आयोजित ई पिक पाणी मार्गदर्शन शिबिरात केले
या बाबत अधिक माहिती देताना सचिन ढोले म्हणाले, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या खरीप हंगामातील पिक पाहणी ची नोंदणी करणे आवश्यक असून यासाठी शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईल मध्ये गूगल प्ले स्टोअर वरून २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन डाउनलोड करावे यामध्ये खरीप हंगाम २०२३ ची ई पीक नोंदणी आपल्या ७/१२ वरती १ जुलैपासून करता येणार आहे या ॲपच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यातील सुमारे १.८८ कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यानी रेजिस्ट्रेशन करून आपल्या पिकांची नोंदणी केली आहे.तालुक्यातील सर्व खातेदार शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ई पीक पाहणी नोंदणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी धुमाळवाडी गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते