Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विडणीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत palkhi swagat

 


विडणी : योगेश निकाळजे 

टाळ-मृदंग व हरिनामाचा गजर करत लाखो भाविकांसह निघालेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटण येथील एका दिवसाच्या मुक्कामानंतर बरडकडे मार्गस्थ झाला. हा वैष्णवांचा मेळा सायंकाळी बरडगावी विसावला सातारा जिल्ह्यातील अखेरचा मुक्काम करून हा सोहळा उद्या शुक्रवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

     श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा गेल्या  4 दिवसापासून सातारा जिल्ह्यात असून लोणंद, तरडगाव व फलटण या ठिकाणचा मुक्काम आटोपून हा पालखी सोहळा बरडच्या दिशेने मार्गस्थ झाला. फलटण ते बरडकडे हा पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना विडणीच्या हद्दीत हा पालखी सोहळा आल्यानंतर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच सागर अभंग,उपसरपंच सुनिल अब्दागिरे पोलिस पाटील सौ शीतल नेरकर मुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव धीरज अभंग सर्जेराव कोकरे अँड अविनाश अभंग सुभाष अभंग विशाल शिंदे तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर विडणी गावच्या पालखी तळावर हा सोहळा विसावल्यानंतर विडणी व परिसरातील लोकांनी दर्शनासाठीमोठी गर्दी केली होती. 



यावेळी सपूर्ण पालखी तळ आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता. यावेळी विडणी व परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या दरम्यान, ग्रामपंचायतीच्या वतीने वारकऱ्यांसाठी विविध सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या यामध्ये अंघोळीसाठी शॉवरची महिला व पुरुषांना स्वतंत्र सोय करण्यात आली होती मोबाईल चार्जिंग पाँईट शंभराहून अधिक शौचालये, मोफत औषधोपचार, मुबलक पाणीपुरवठा यासह अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्याने वारकरी वर्गांमधून समाधान व्यक्त केले जात होते तसेच गावातील महात्मा फुले युवक संघटना व विविध तरुण मंडळांच्या वतीनेही चहा-नाश्ता, पाण्याची मोफत सोय करण्यात आली होती. सकाळी 10च्या सुमारास हा पालखी सोहळा विडणी येथून पुढे मार्गस्थ झाला. विडणीनंतर पिंप्रद या ठिकाणी11.30 वाजता हा पालखी सोहळा पोहोचल्यानंतर सरपंच स्वाती भगत उपसरपंच सागर बोराटे पोलिस पाटील सुनिल बोराटे ग्रामसेवक बळीप व ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले. दुपारी 2 वाजेपर्यंत पिंप्रद याठिकाणीच हा सोहळा विसावला दरम्यान माऊलींच्या पादुकांना अभिषेक घालण्यात आला तसेच नैवेद्य दाखवून हरिनामाचा जयघोष करण्यात आला यावेळी पिंप्रदसह परिसरातील राजाळे, सरडे निंबळक, सोनवडी, वडले, तसेच अन्य गावातील भाविकांनी मोठ्या संख्येने येऊन माऊलींचे दर्शन घेतले, दुपारी हा पालखी सोहळा पुढे निंबळक (वाजेगाव) येथे थांबून पुढे बरड येथील मुक्कामास सायंकाळी सातच्या सुमारास पोहचला, यावेळी कमानीजवळ सरपंच प्रकाश लंगुटे उपसरपंच ज्ञानदेव निगडे पोलिस पाटील अश्वीनी टेंबरे तसेच ग्रामस्थ यांनी पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले बरड याठिकाणी माऊलींच्या स्वागतासाठी तसेच वारकऱ्यांसाठी ग्रामपंचायती सह प्रशासकीय,आरोग्य यंत्रणा यांनी जय्यत तयारी केली आहेआरोग्य विभागाच्यावतीने गावातील सर्व ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत महावितरण विभागाकडून बरड गावातील प्रत्येक विदुत पोलवरती रोडलाईट लवली आहे तसेच प्रत्येक शौचालयाच्या ठिकाणी लाईटची सोय केली असून भाविकांची मोबाईल चार्जिंगचीही सोय करण्यात आली आहे,दरम्यान आजचा बरड येथील मुक्काम आटपून उद्या शुक्रवारी हा सोहळा सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.