साखरवाडी गणेश पवार
विडणी तालुका फलटण गावाच्या हद्दीमध्ये दि 13 रोजी दुपारी 1.20 वाजण्याच्या सुमारास कोकरे वस्ती येथील विठ्ठल नाळे यांचे पडीक जमिनीमध्ये कत्तल करण्याकरिता चार गोवंशीय खोंडे चारा पाण्याची व्यवस्था न करता डांबून ठेवल्या प्रकरणी व एका खोंडाची विना नंबर प्लेट स्प्लेंडर गाडीवरून बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी एका अल्पवयीन युवका सह तिघा जणांवर वर गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याची फिर्याद सौरभ सुनील सोनवले यांनी दिली असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, संशयित राजा अब्बा शेख (वय 25), सुलेमान गफूर शेख (वय 25) व एक अल्पवयीन तिघेही राहणार सरडे ता फलटण यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो हवा अडसूळ करीत आहेत