साखरवाडी(गणेश पवार)
सुरवडी ता फलटण गावच्या हद्दीमध्ये निरा उजवा (१४ मोरी) कालव्यात सायकल वरून तोल जाऊन २५ फूट खोल कोरड्या कालव्यात डोक्यावर पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, दिनांक २९ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास वसंत हरिभाऊ काटकर वय ६० रा खामगाव ता फलटण हे सायकल वरून सुरवडी गावच्या हद्दीतील नीरा उजवा कालव्यावरून खामगावच्या दिशेने जात होते १४ मोऱ्या नामक ओढ्यावरील पुलावरून जात असताना त्यांचा सायकलवरून तोल गेल्याने ते २५ फूट खोल कोरड्या कालव्यामध्ये डोक्यावर पडले यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आजू बाजूच्या नागरिकांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी साखरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली असून फिर्याद दीपक काटकर यांनी दिली आहे पुढील तपास महिला पोलीस हवालदार कदम करीत आहेत