साखरवाडी(गणेश पवार)
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे तसेच अखंड हिंदूस्थानावर 42 वर्षे राज्यकारभार करणारे
हिंदनृपती छत्रपती थोरले शाहू महाराज पालखी सोहळा
क्षेत्र गांगवली (माणगाव) ते पोवई नाका (राजधानी सातारा) आयोजित करण्यात आला होता .सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करत असलेल्या अनेक संस्थांचा यावेळेस सन्मान करण्यात आला, रक्तदान क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी पाहता रात्री अप रात्री गरजू ना होणारी मदत यामुळे हर्ष फाउंडेशनला शाहू पुरस्कार सन्मान देऊन गौरव करण्यात आला .सातारची कन्या शिव शंभू शाहू यांचा वारसा जपणारी प्रसिद्ध
शिवव्याख्याती कु. सायली प्रमोद भोसले पाटील हिचे शाहू महाराज यांच्या जिवनचरित्रावर आधारित व्याख्यान.. हे सर्व शिवभक्तांसाठी आणि गांगवली ग्रामस्थांसाठी नवसंजीवनी देणारे ठरले. स्वाती गायकवाड ह्या शिवकन्या ही उपस्थितीत होत्या.
त्याचप्रमाणे शिवशाहीर गणेशदादा ताम्हाणे व शिवशाहीर प्रवीण दादा फणसे यांचा शाहू महाराजांच्या वर आधारित पोवाडा कार्यक्रम.. खूप छान पद्धतीने पार पाडण्यात आला
सोहळा समितीचे संस्थापक माननीय श्री प्रमोद दादा भोसले आणि सर्व सहकारी बांधवांनी खूप छान पद्धतीने नियोजन केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन