Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सुरवडी गावचे पोलिस पाटील संतोष पवार 'बेस्ट पोलिस पाटील' म्हणून सन्मानित police patil

 


साखरवाडी(गणेश पवार)

सुरवडी गावचे पोलिस पाटील संतोष बबनराव पवार यांनी माहे मार्च 2023 या कालावधीत गावातील 4 बांधावरील व किरकोळ वाद मिटवले,4 अपघातग्रस्तांना मदत केली,होळी व धुलीवंदन हा  बिहारी लोकांचा कार्यक्रम  गावामध्ये उपस्थित राहून शांततेत पार पाडला,  कमिन्स कंपनीला निवेदन देतेवेळी  गावात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही,कोरेगाव व लोणंद पोलिसांना तपास कामी मदत केली, 11 समन्स ची बजावणी कामी पोलीसांना मदत केल्याबद्दल फलटण तालुक्यात सर्वाधिक 610 गुण मिळाले होते




 म्हणुन माहे मार्च महिन्याचा बेस्ट पोलीस पाटील ऑफ द मंथ २०२३ हा पुरस्कार फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिपकराव चव्हाण यांच्या हस्ते दि 1 मे रोजी देण्यात आला यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी फलटण तानाजी बरडे उपविभागीय प्रांतअधिकारी फलटण शिवाजीराव जगताप, फलटण तालुका तहसीलदार समीर यादव , फलटण ग्रामीण पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे  यांची प्रमुख उपस्थिती होती.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.