साखरवाडी(गणेश पवार)
फलटण शहर पोलीसांनी दि 5 मे रोजी फलटण शहरात पेट्रोलिंग करीत असताना डीएड चौक ते डेक्कन चौक या रस्त्यावर संशयित तेजस मनोज शिंगाडे (वय 19 रा विद्यानगर साखरवाडी ता फलटण) हा युवक हिरो स्प्लेंडर प्लस या मोटर सायकलवर संशयित रित्या उभा राहिलेला आढळल्याने पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर मोटर सायकल त्याने मार्केट यार्ड पुणे इथून चोरी करून आणल्याचे निष्पन्न झाले असून फलटण शहर पोलीस ठाण्यात संशयित युवकावर गुन्हा दाखल झाला असून त्याच्या ताब्यातून 50 हजार रुपयाची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.