विडणी (योगेश निकाळजे ) - विडणी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी बापूराव भगवान पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
विडणी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक डिसेंबर 2022 मध्ये झाली होती यामध्ये राष्ट्रवादी पार्टीच्या उत्तरेश्वर पॅनेलचे निवडून आलेले उमेदवार रामदास भगवान पवार यांचे निवडणूक झाल्यानंतर अल्पावधीतच निधन झाल्याने त्यांची सदस्यपदाची जागा रिक्त होती त्यामूळे या जागेसाठी लागलेल्या पोटनिवडणूकीसाठी त्यांचे मोठे भाऊ बापूराव भगवान पवार यांनी अर्ज दाखल केला होता मात्र भाजपप्रणित विडणी विकास आघाडीने त्यांच्या विरोधात आपला उमेदवार न दिल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडीबदल श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डाॅ.बाळासाहेब शेंडे,सरपंच सागर अभंग उपसरपंच सुनिल अब्दागिरे, सर्जेराव नाळे, राजीव पवार, सोसायटीचे चेअरमन मारूती नाळे तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी बापूराव पवार यांचे अभिनंदन केले