साखरवाडी गणेश पवार
जिंती तालुका फलटण येथील फिर्यादी शोभा बाळू रणवरे यांचे पती बाळू रणवरे हे दिनांक 15 मे रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास उकिरड्यावर कचरा टाकण्यासाठी जात असताना त्यांना संशयित रवींद्र दिनकर वाघमारे, राहुल दिनकर वाघमारे ,विशाल राजेंद्र वाघमारे व आनंद राजेंद्र वाघमारे सर्व रा जिंती ता फलटण यांनी कुऱ्हाडीने फिर्यादीच्या पतीच्या डाव्या पायाच्या मांडीवर व छातीवर वार करून काठीने मारहाण करून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चौघा संशयितां विरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार विलास यादव करीत आहेत