फलटण येथे महात्मा दिन उत्साहात साजरा
साखरवाडी(गणेश पवार)
महात्मा फुले यांना 11 मे 1888 रोजी मुंबईतील मांडवी कोळीवाडा येथे असलेल्या वडगांव गादी रघुनाथ अर्थात रघुनाथ महाराज सभागृह मध्ये झालेल्या कार्यक्रमात मुंबईतील कष्टकरी जनतेच्यावतीने " महात्मा" पदवी प्रदान केली होती. या वेळी फुलेंचे वय साठ पूर्ण झाले होते त्यांनी केलेल्या कृतिशील सामाजिक कामासाठी जनतेने त्यांना महात्मा पदवी दिली आजही त्यांचे कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी आहे असे विचार कृषिउत्पन्न बाजार समितीचे नवं नियुक्त संचालक तुकाराम शिंदे यांनी संत सावतामाळी मंदिर येथे महात्मा फुले जयंती उत्सव समिती आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले
कार्यक्रमाच्या सुरवातीला महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांच्या नवीन मूर्तींचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सुजन फाउंडेशन व महात्मा फुले विचार अभियान चे अध्यक्ष अजितकुमार जाधव यांनी महात्मा फुले यांच्या कृतिशील कार्याची माहिती दिली सुभाष अभंग यांना महाराष्ट्र शासनाचा सामाजिक कार्य पुरस्कार मिल्याबद्दल त्यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला गणेश तांबे यांनी आभार व्यक्त केले