साखरवाडी गणेश पवार
धुमाळवाडी तालुका फलटण येथील श्री महादेव मंदिराचा जिर्णोद्धार, शिवलिंग, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहणाचा समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला प पू 108 महंत श्री सुंदरगिरी महाराज (पुसेगाव) व महंत श्री उमेशानंद सरस्वती महाराज (खामगाव) यांच्या शुभहस्ते विविध धार्मिक कार्यक्रमात कलशारोहणाचा कार्यक्रम पार पडला दिनांक 11 रोजी सकाळी सहा वाजल्यापासून मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी धुमाळवाडीतील ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते