साखरवाडी (गणेश पवार)
सुरवडी, नांदल तालुका फलटण गावातील चार खेळाडूंची नेपाळ येथे होणाऱ्या 14 वर्षाखालील निमंत्रित आंतरराष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेसाठी निवड झाली आहे
दिनांक 18 व 19 मे रोजी रंगशाळा स्टेडियम पोखरा नेपाळ या ठिकाणी होणाऱ्या 14 वर्षाखालील निमंत्रित आंतरराष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेसाठी सुरवडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी पूर्वा यादव तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगम नगर नांदल मधून वैष्णवी भगत, शिवानी गायकवाड व पियुष जगदाळे यांची भारतीय संघात निवड झाली आहे