साखरवाडी(गणेश पवार)
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या फलटण शाखेच्या कार्यकर्त्यांची सभा नुकतीच प्रसाद शिंगाडे यांच्या निवासस्थानी पार पडली. या सभेला राज्य कार्यकारिणी सदस्य प्रशांत पोतदार आणि भगवान रणदिवे यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी मंदाकिनी गायकवाड यांनी फलटण शाखेच्या गेल्या सहा महिन्यांतील कामकाजाची माहिती दिली. त्यानंतर प्रशांत पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी डॉ. दीपक शेंडे यांची आणि उपाध्यक्ष तसेच वार्तापत्र व प्रकाशन विभाग कार्यवाह पदी आत्माराम बोराटे यांची निवड झाली,कार्याध्यक पदी मंदाकिनी गायकवाड,प्रधान सचिव व महिला विभाग कार्यवाह पदी मोहिनी भोंगळे,बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह पदी आनंद देशमुख,जात निर्मूलन व विवेकी जोडीदार निवड विभाग कार्यवाह पदी व वार्तापत्र व प्रकाशन विभाग कार्यवाह पदी गोपाळ सरक, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प विभाग व सोशल मीडिया विभाग कार्यवाह पदी अभिजित रणवरे, विविध उपक्रम व सांस्कृतिक विभाग कार्यवाह पदी प्रसाद शिंगाडे, मानसिक आरोग्य विभाग कार्यवाह पदी सचिन काकडे, युवा व विवेकवाहिनी विभाग कार्यवाह पदी गणेश भोंगळे, प्रशिक्षण विभाग कार्यवाह पदी बोबडे याप्रमाणे विविध विभागांच्या कार्यवाहपदांच्या नियुक्त्या झाल्या. यावेळी राज्य बुवाबाजी संघर्ष विभाग सदस्य भगवान रणदिवे यांनी विज्ञानवादी गीताचे गायन केले.