साखरवाडी गणेश पवार
उपळवे तालुका फलटण येथील साखर कारखान्याची ट्रॅक्टरची खोटी कागदपत्रे सादर करुन फसवणूक करण्यात आली आहे . याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात नऊजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे . साहेबराव गणपत जाधव (रा साय गव्हाण ता कन्नड जि औरंगाबाद, भाऊराव अनिल ढवळे ( रा . शेवरे ता . माढा जि . सोलापूर ) , किरण रमेश घाडगे ( रा . भडीशेगाव ता . पंढरपूर जि . सोलापूर ) , अर्जुन साहेबराव शिंदे ( रा . कारण बुद्रुक जि . बीड ) , मल्हारी अशोक चनने ( रा . कळवडी ता.पाथर्डी ) , प्रवीण मारुती धोंडे ( रा . रुई नालकल जि . बीड ) , युवराज चिंतामण पाटील ( रा . गणेशपूर , ता चाळीसगाव ) , सुरज बाजीराव भोईटे ( रा . रोकडे जि . जळगाव ) , अमोल गंगाधर पवार ( रा रोशननगर जि . जळगाव ) अशी संशयितांची नावे आहेत . याबाबत प्रदीप बाबासो मोहिते , नितीन राघू करणे व अनिलकुमार पांडुरंग तावरे ( तिघे रा . उपळवे ता . फलटण ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . संशयितांनी ट्रॅक्टरची खोटी कागदपत्रे सादर करुन कारखान्याकडून पैसे घेवून त्याचा गैरवापर करून दमदाठी व मारहाण करण्याची धमकी देत कारखान्याची व तक्रारदाराची आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अरगडे करत आहेत .