साखरवाडी(गणेश पवार)
मुलीचा पाठलाग केल्या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोन तरुणाच्या विरोधात एका मुलीने तक्रार दाखल केली असून या प्रकरणी दोन तरुणांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि.१३ रोजी ११:३० वाजण्याच्या सुमारास मुधोजी काँलेज फलटण ते जीवा महाले चौक येथील बस स्टाँप कडे फिर्यादी मुलगी रस्त्याने पायी चालत जात असताना अचानक पाठीमागुन आकाश दादासो झेंडे (रा.वाठार निंबाळकर ता.फलटण) व ओंकार पोकळे (रा.गोळेवाडी ता.फलटण) हे दोघेजण मोटार सायकल वरती आले व आकाश झेंडे हा फिर्यादी मुलीस म्हणाला की, "मला तुझ्याशी बोलायचे आहे त्यावर मुलीने त्यास म्हणाले की माझ्या वडिलांशी बोल''असे म्हणुन मुलगी नर्सिंग काँलेजचे समोरुन बस स्टाँप कडे पायी चालत जात असताना ते दोघेजण मोटार सायकल वरुन मुलीच्या पाठीमागे आला व मुलगी बस मध्ये चढल्यानंतर ते दोघेजण माझेकडे रागाने पाहत जोरात त्यांचे मोटार सायकलवरती पुढे निघुन गेले. याप्रकरणी फिर्यादी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून दोन तरुणांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पो.हवा काकडे हे करत आहेत.