साखरवाडी(गणेश पवार) फलटण बस स्थानकात काम करणाऱ्या सुरेखा योगेश गोफणे या महिला वाहकाने फलटण आगार व्यवस्थापक वासंती जगदाळे, सुखदेव अहिवळे व राजेंद्र वाडेकर या मानसिक छळ करीत असल्याने त्यांच्यावर चौकशी करून कारवाई करावी अन्यथा कुटुंबा समवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असले बाबतचे निवेदन दिल्याने एक महिला अधिकारी महिला कर्मचाऱ्यावर अन्याय करत असल्याने कर्मचारी वर्गात संताप व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,सुरेखा योगेश गोफणे या फलटण बस स्थानकात वाहक पदावर काम करत असून त्यांनी विभागीय नियंत्रक सातारा, जिल्हाधिकारी सातारा, जिल्हा पोलीस प्रमुख सातारा, पोलीस निरीक्षक फलटण, आगार व्यवस्थापक फलटण यांना दिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की, फलटण आगार व्यवस्थापक वासंती जगदाळे, सुखदेव अहिवळे व राजेंद्र वाडेकर हे फलटण बस स्थानकात महिला वाहकांना व तक्रारदार वाहक सुरेखा योगेश गोफणे यांना नाईट आऊट ड्युटी लावणे, वेळेवर गाडी न देता दिवसभर थांबून ठेवून गैरहजरी लावणे, मानसिक छळ करणे असे प्रकार करत आहेत.
फलटण आगार व्यवस्थापक वासंती जगदाळे या आगार परिसरात इमारतीमध्ये रहात नसल्यामुळे त्यांचे आगारा मधील प्रशासनावर कोणतेही नियंत्रण नाही. प्रशासनातील काही लोकांचे ऐकून महिला कर्मचाऱ्यांवर अन्याय करत आहेत व महिलांना रात्री १० नंतर संपणाऱ्या ड्युटी जाणीवपूर्वक लावत आहेत तसेच महिला वाहकांना सकाळी वेळेवर गाड्या न देता दिवसभर थांबवून सुखदेव अहिवळे व राजेंद्र वाडेकर यांचे ऐकून दुसऱ्या दिवशी गैरहजेरी लावत आहेत आगारामध्ये महिलांना अर्वाच्य बोलुन मानसिक छळ केला जात आहे.
याबाबत चौकशी करून आगार व्यवस्थापक वासंती जगदाळे, सुखदेव अहिवळे व राजेंद्र वाडेकर यांच्यावर महिलांना त्रास देणे व मला ही त्रास देणे यावर चौकशी होऊन आठ दिवसात कार्यवाही करावी अन्यथा होणाऱ्या परिणामास आपणांस जबाबदार धरून जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे कुटुंबा समवेत आमरण उपोषण करणार आहे अशी मागणी महिला वाहक सुरेखा योगेश गोफणे यांनी निवेदनाद्वारे केला आहे.
फलटण आगारात एक महिला अधिकारी ईतर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर अन्याय करत असून मानसिक त्रास देत असल्याचा आरोप होत असल्याने आजही शासकीय सेवेत महिला कर्मचारी यांना विविध प्रकारे त्रास सहन करावा लागत असल्याचे स्पष्ट होत आहे. बऱ्याच वर्षांपासून फलटण आगार मधील काही कर्मचाऱ्यांवर कामाच्या नेमणुकमध्ये सेवाज्येष्ठत व नियम अटी न पाळता आर्थिक देवाण घेवाण मधुन अन्याय होत असल्याचा कर्मचाऱ्यांकडून आरोप होत होता. आता याप्रकरणी चौकशी करून जबाबदार महिला अधिकारी व ईतर अधिकारी यांच्यावर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.