साखरवाडी(गणेश पवार)
खामगाव तालुका फलटण येथील मुरूम साखरवाडी रस्त्यावर दि 3 मे रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास दुचाकी घसरून झालेल्या अपघातात डोक्याला व पायाला गंभीर मार लागल्याने प्रकाश धर्माजी कांबळे (वय 70) यांचा मृत्यू झाला झाल्याची घटना घडली असून याबाबत दुचाकी चालक पोपट मारुती सोनवणे (रा मुरूम ता फलटण) यांच्या विरोधात बापू राहुल कांबळे (रा मुरूम तालुका बारामती जिल्हा पुणे) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार दिनांक 3 मे रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास चुलते प्रकाश धर्माजी कांबळे हे पोपट सोनवणे यांच्या टीव्हीएस एक्सल क्रमांक एम एच 11 बी एल 19 98 या दुचाकीवरून घरी येत असताना दुचाकी रस्त्यावर घसरून खाली पडून चुलते प्रकाश कांबळे यांचा मृत्यूस पोपट सोनवणे हे कारणीभूत असल्याचे फिर्यादित म्हटले आहे पुढील तपास स पो नि शिंदे करीत आहेत