Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अपहरण,शिवीगाळ,मारहाण प्रकरणी जिंतीत 14 जणांवर गुन्हा दाखल crime

 


साखरवाडी(गणेश पवार)  जिंती ता फलटण गावाच्या हद्दीत श्री जीतोबा देवस्थान मंदिरामध्ये अपहरण करण्याचा प्रयत्न करणे व बेकायदेशीरपणे जमाव जमवून शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करणे या प्रकरणी चौदा जणांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि.२ फेब्रुवारी   रोजी सायंकाळी ७ वाजता ते दि १४ मे रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास गावातील श्री जीतोबा देवस्थान मंदिरात वृषभ दिलीप रणवरे (रा. जिंती ता. फलटण) याने स्वताचे अंगात आणून तु माझे धंद्याचे वाटोळे केलेस, तु देव घातलास त्यामुळे मला त्रास होत आहे. असा आरोप फिर्यादी दिलीप सदाशिव रणवरे (रा. जिंती ता. फलटण जि. सातारा) यांच्यावर करून तेथेच असलेला देवाचा लोखंडी त्रीशूळ व देवाची झोळी घेवून वृषभ दिलीप रणवरे हा फिर्यादी यांच्यावर हल्ला करणेसाठी अंगावर धावून आला व तुला मी अँक्सेप्ट करणार नाही, तुला मी चॅलेंज देतो, मी तुला संपवायलाच आलोय अशी धमकी देवून त्याने फिर्यादी यांना हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. नंतर दिलीप रत्नसिह रणवरे व त्याचे सोबत दोन अनोळखी इसम यांनी फिर्यादी यांची गाडी अडवून अपहरण करणेचा प्रयत्न केला. तसेच बगाड यात्रेचा फिर्यादी जो कार्यक्रम करतो तसाच कार्यक्रम वृषभ दिलीप रणवरे याचे कडून करत असताना सदर ठिकाणी फिर्यादी यांची मुलगी स्वाती रणवरे ही तीचे मोबाईलमध्ये शुटींग करित असताना सुजाता पवार (पुर्ण नाव माहीत नाही) (रा. मुंबई ) मैना सोनवने (पुर्ण नाव माहीत नाही)( रा. कोऱ्हाळे बुद्रुक ता. बारामती जि. पुणे) यांनी मुलीस हाताने व लाथाबुक्यांनी मारहान केली तसेच सत्यवान दत्तोबा रणवरे, उदयसिंह शिवराम रणवरे, मनोहर मोहन रणवरे, मोहण कृष्णा रणवरे, बाळासो कृष्णा रणवरे ,भानुदास बापू रणवरे,निखिल भानुदास रणवरे, मनोहर मोहण रणवरे यांचा मुलगा (नाव माहीत नाही) (सर्व रा. जिंती ता. फलटण जि. सातारा) यांनी शिवीगाळ दमदाटी केली म्हणून चौदा जणांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्यादी

दिलीप सदाशिव रणवरे यांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार हांगे करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.