Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विनयभंग प्रकरणी मानेवाडी ता फलटण येथील एकावर गुन्हा दाखल vinay bhang

 


साखरवाडी(गणेश पवार) मौजे वाठार निंबाळकर येथे एका महिलेला मोबाईल नंबर दे नाहीतर तुझ्या आख्या खानदानाला संपवुन टाकेन असे म्हणुन शिवीगाळ दमदाटी करत विनयभंग केल्याप्रकरणी एक जणांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,  मौजे वाठार निंबाळकर गावचे हद्दीत वाठार फाटा येथे दिनांक 18 रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास संशयीत अजित जगन्नाथ जाधव (रा. मानेवाडी तालुका फलटण) याने फिर्यादी महिलेच्या जवळ येवुन तुझा मोबाईल नंबर दे नाहीतर तुझ्या आख्या खानदानाला संपवुन टाकेन असे म्हणुन शिवीगाळ दमदाटी करुन फिर्यादी महिलेचा उजवा हात धरून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी फिर्यादी महिला तक्रारीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी साठी करण्यात आले आहे या गुन्ह्याचा अधिक तपास  स.पो.फौ राऊत करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.