साखरवाडी(गणेश पवार)
साखरवाडी ता फलटण येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठया उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक 12 रोजी बाजारतळ साखरवाडी येथे रात्री 8 वाजता भीम गीतांचा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन उत्सव समितीतर्फे करण्यात आले होते तसेच दिनांक 13 एप्रिल रोजी रक्तदान शिबिर व वक्तृत्व स्पर्धा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी समितीचे अध्यक्ष विशाल मोरे,उपाध्यक्ष सिद्धार्थ भोसले,साखरवाडी ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती
शुक्रवार दि. 14 रोजी सायंकाळी 6 वाजता पोलीस स्टेशन (साखळी गेट) येथून बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुक रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान साखरवाडी बस स्टैंड वरती आल्यानंतर या ठिकाणी फटाक्याची भव्य आतिषबाजी करून हजारोंच्या संख्येने भीमसैनिकानीं भीमगीताच्या तालावर ठेका ठरला होता लहान मुले,युवक, महिला गळ्यात निळे स्कार्फ,फेटे,टोप्या परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते यावेळी याठिकाणी परिसरातील नागरिक व भीमसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.