विडणी ( योगेश निकाळजे ) - विडणी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठया उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने संघमित्र तरूण मंडळाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये तक्षशिला बुध्दविहारात सामुदायिक बुद्धवंदना व भिमस्तूतीचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर सांस्कृतिक तसेच जागर समतेचा परिवर्तन काव्य जलसा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कु. प्राची मोहिते हिने मी रमाबाई आंबेडकर बोलतेय हा एकपात्री कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमास फलटण पोलिस ठाण्याचे पीएसआय दिपाली गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपासक उपासिका मोठया संख्येने उपस्थित होत्या.
शुक्रवार दि. 14 रोजी सकाळी 9 वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर जयंतीनिमिताने कार्यक्रम आयोजीत करण्यात आला यावेळी सरपंच सागर अभंग, श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे,पोलिस पाटील शीतल नेरकर, उपसरपंच सुनिल अब्दागिरे ,ग्रामविकास अधिकारी आप्पासाहेब साळूंखे व इतर मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले, यावेळी सरपंच सागर अभंग,डॉ.बाळासाहेब शेंडे,अशोक पवार, राजेंद्र मोरे, बबलू घोरपडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली, यावेळी उपस्थितांचे स्वागत कैलास जगताप यांनी केले तर आभार बाबासाहेब जगताप यांनी मानले, यावेळी ग्रामपंचायत व सोसायटीचे सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते, सायंकाळी 7 वाजता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची गावातून सवाद्य भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली.
दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सागर अभंग यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, उत्तरेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात पोलिस पाटील सौ. शीतल नेरकर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहारअर्पण करण्यात आला तसेच विडणी व पंचक्रोशीतील विविध शासकीय कार्यालये ,पतसंस्था, शाळांमध्ये ही बाबासाहेबांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.