साखरवाडी गणेश पवार
होळ ता फलटण येथील विकास सोसायटीच्या चेअरमन पदी चंद्रकांत भिमराव भोसले यांची तर व्हाईस चेअरमनपदी चंद्रकांत जाडकर यांची निवड झाली असून त्यांच्या या निवडी बद्दल विधान परिषदेचे मा सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपकराव चव्हाण, जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले यावेळी होळ विकास सोसायटी सभागृहामध्ये पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, महानंदा दूध डेअरी चे विद्यमान संचालक डी के पवार, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हा चेअरमन नितीन शाहूराजे भोसले, मातोश्री कंट्रक्शनचे संजय भोसले, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे सेक्रेटरी गोरख भोसले, शरदराव जाधव, खामगाव चे माजी सरपंच नितीन जगताप व राष्ट्रवादी राजे गटाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.