Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सुरवडी यात्रा कमिटीचा जिल्ह्यात आदर्शवत उपक्रम भैरवनाथ यात्रेनिमित्त फक्त महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन mahila karykaram

 



साखरवाडी गणेश पवार

सुरवडी तालुका फलटण गावच्या ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने सुरवडी ग्रामपंचायत व यात्रा कमिटीने संपूर्ण सातारा जिल्ह्यात आदर्शवत उपक्रम राबवित फक्त महिलांसाठी 'महाराष्ट्राची गौरवगाथा' या  आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला सुरवडी गावातील व  आसपासच्या वाड्या वस्त्यांवरील हजारो महिलांची उस्फूर्त उपस्थिती होती.

  वास्तविक गावची यात्रा म्हटले की तमाशा व ऑर्केस्ट्रा असे कार्यक्रम यात्रा कमिटी कडून आयोजित केले जातात यावेळी पुरुष व तरुणांची या कार्यक्रमाला जास्त गर्दी असते व  मैदानाच्या एका कोपऱ्यात फक्त हाताच्या बोटावर मोजण्याच्या इतक्याच महिला उपस्थित  असतात   अशावेळी थिल्लर गाण्यांवर विक्षिप्त नाचगाणे करून तरुण व काही मद्यपी आरडाओरडा करीत असल्याने महिलांना अशा कार्यक्रमांना उपस्थित राहण्यात मर्यादा येतात व बऱ्याचशा महिला अशा कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे  टाळतात.  मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत  सुरवडी ग्रामपंचायत व भैरवनाथ यात्रा कमिटी यांनी या वर्षी नवीन प्रथा पाडत  दिनांक 20 एप्रिल रोजी फक्त महिलांसाठी 'महाराष्ट्राची गौरवगाथा' हा  महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख दाखवणारा लोकगिते व  भावगीतांचा  कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला गावातील  महिलांनी उस्फूर्त प्रतिसाद देत अशा स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे ग्रामपंचायत व यात्रा कमिटीचे विशेष आभार मानले यावेळी कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.