Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

खंडाळा तालुक्यात पाडळी, बोरीला गारपीटीने झोडपले gaarpit

 


साखरवाडी(गणेश पवार)

खंडाळा तालुक्यातील पाडळी आणि बोरी परिसराला अवकाळी  गारांच्या पाऊसाने झोडपून काढले .सर्वत्र गारांचा सडा पडला होता त्यामुळे या परिसराला जम्मू काश्मीरच्या स्वरूप आले होते . सोसाट्याचा वारा , मेघ गर्जनेसह झालेल्या पाऊसाने पाणीच पाणी केले .

दरम्यान ,वाई खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यात झालेल्या अवकाळी व गारांच्या पावसाने नुकसान झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याची सुचना आमदार मकरंद पाटील यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना केलीय .


  पाडळी आणि बोरी परिसरामध्येआज दुपारी अचानकपणे अवकाळी पावसाने हजेरी लावली यावेळी जोरदार गारांच्या पावसाने परिसराला झोपून काढलं. या सर्व पावसामध्ये पिकांचे नुकसान झाले तर शेतकरी वर्ग व नागरिकांची तारांबळ उडाली .

आज सकाळपासूनच प्रचंड असा उकाडा जाणवत  होता . दुपारनंतर मेघ गर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. या पावसाबरोबरच गारांचा वर्षाव सुरू झाला .या परिसरातील नागरिकांनी आडोशाला आश्रय घेतला .

खंडाळा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी गारांचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालय 


 वाई खंडाळा महाबळेश्वर या तिन्ही तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी व गारांच्या पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकाचे व अन्य नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना आमदार मकरंद पाटील यांनी वाईचे प्रांताधिकारी वाई खंडाळा व महाबळेश्वरचे तहसीलदार यांना केल्या आहेत  .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.