Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विडणीतील महिलेच्या विनयभंगप्रकरणी पाटस येथील एकावर गुन्हा दाखल crime



विडणी (योगेश निकाळजे)विडणी येथील एका विवाहित महिलेचा  विनयभंग केल्याची तक्रार महिलेने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.

    याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार विडणी ता. फलटण येथील एका विवाहित महिलेचा संशयित  दिपक बाबुराव जाधव रा.पाटस ता.दौंड,जि.पुणे याने 17एप्रिल 2023 रोजी दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास विडणीत येऊन हात धरला व म्हणाला की,तु माझ्याशी लग्न का केले नाही व तु मला आवडतेस व तु माझ्याशी शारीरिक संबंध ठेव असे म्हणून माझ्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व नंतर म्हणाला की,मी तुझ्यासाठी बारामती येथे भाडयाने प्लॅट घेतला आहे तु जर आली नाहीस तर तुझ्या नवऱ्याला जेलमध्ये टाकेन तेव्हापासून तो मला वेळोवेळी शिवीगाळ दमदाटी करून त्रास देत आहे अशी तक्रार सदर महिलेने दिपक बाबूराव जाधव रा.पाटस, ता.दौंड, जि.पुणे याच्याविरोधात दिली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक धोंगडे  व बीट हवालदार अडसूळ हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.