साखरवाडी(गणेश पवार) ग्रामीण पोलिसांनी साखरवाडी व खटकेवस्ती येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी जुगार मटका घेताना दोन जणांना मुद्देमालासह पकडले असून या दोन्ही गुन्ह्यात तीन जणांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिंनाक १७ रोजी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमाराला मौजे साखरवाडी तालुका फलटण गावच्या हद्दीत कारखान्याचे गेट च्या समोर आडोशाला सलुन दुकानाचे आडोशाला अजित ज्ञानदेव देवकर (वय ४५ वर्षे रा.साखरवाडी ता.फलटण) हा बेकायदा बिगर परवाना कल्याण नावचा मटका मजुरीने काम करीत असुन त्यांचा मालक जय कुमार शंकर पवार (रा. मलटण फलटण) यांचे सांगणेवरुन व दोघांचे आर्थीक फायदया करीता लोकांचेकडुन पैजेवर पैसे स्विकारुन कल्याण नावचा मटका दोघांचे आर्थीक फायदया करीता लोकांचेकडुन पैसे स्विकारत असताना रोख रक्क्म व मोबाईल असे एकूण १० हजार ६८५ रुपये व मटक्याचे साहित्य आढळून आले. याबाबत पो. हेड कॉन्स्टेबल निखिल आत्माराम गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली असून अधिक तपास स.पो.फौ हांगे करत आहेत.
तर दुसऱ्या प्रकरणात दिंनाक १७ रोजी सायंकाळी ४:४० वाजण्याच्या सुमाराला मौजे खटकेवस्ती ता. फलटण गावचे हद्दीत लक्ष्मी मंदिराचे जवळ असले झाडाच्या आडोश्याला नितीन बापूराव कदम (वय ४५ वर्षे रा. खटकेवस्ती ता.फलटण) हा स्वताचे व जय पवार (पुर्ण नाव माहित नाही) (रा. मलटण ता. फलटण) याचे फायदयासाठी चिठठीवर पैसे स्विकारुन कल्यान मटका जुगार चालवित असताना त्याच्याजवळ एकूण १ हजार ८२ रुपये किंमतीचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जवळ आढळून आले आहे. याबाबत पो. कॉन्स्टेबल गणेश महादेव अवघडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास स.पो.फौ सूर्यवंशी करत आहेत.