Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्री क्लीनिकच्या रौप्य महोत्सवानिमित्त हिमोग्लोबिन तपासणी व मोफत औषध वाटप vatap



साखरवाडी (गणेश पवार)


साखरवाडी ता फलटण येथील सर्व सामान्य नागरिकांचे हक्काचे फॅमिली डॉक्टर अशी ओळख असलेल्या प्रकाश कदम यांच्या श्री   क्लिनिकने यावर्षी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून त्यानिमित्त दि19 मार्च ते 24 मार्च रोजी सर्वांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी व औषध वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे. 


  मुरूम तालुका बारामती येथील सर्वसामान्य कुटुंबातील डॉक्टर  प्रकाश कदम यांनी 1998 साली साखरवाडीत छोट्याशा जागेत श्री क्लीनिक  सुरू केले याला आता बघता बघता 25 वर्ष पूर्ण झाली डॉ कदमांची साखरवाडी परिसरात मितभाषी, विनम्र, सुसंस्कृत डॉक्टर म्हणून ओळख आहे.


 दिनांक 19 मार्च ते 24 मार्च रोजी होणाऱ्या मोफत हिमोग्लोबिन व औषध वाटपाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन डॉक्टर प्रकाश कदम यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.