Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर jahir

 


साखरवाडी(गणेश पवार) 

कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण च्या १८ जागासाठी पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १८ जगासाठी एकूण २ हजार ९४२ मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत.निवडणूक कार्यक्रमानुसार फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदान व मतमोजणी 30 एप्रिल 2023 रोजी होणार आहे.



निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे 


या निवडणूक कार्यक्रमानुसार सोमवार, दि. २७ मार्च ते दि. ३ एप्रिल दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज मिळतील व अर्ज दाखल करता येतील, दि. ५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत सर्व दाखल उमेदवारी अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात होईल,  दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात छाननी नंतर वैध अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाईल, दि. ६ ते २० एप्रिल रोजी दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. दि. २१ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे आणि उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.मतदान व मतमोजणी ठिकाण नंतर जाहीर करण्यात येणार आहे. दि. ३० एप्रिल रोजी सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत मतदान आणि त्यानंतर मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासाने मतमोजणी होऊन मतमोजणी निकाल जाहीर करण्यात येईल.



संचालक मंडळाची निवड पध्दती पुढीलप्रमाणे 



महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व त्याखालील नियम १९६७ मधील तरतूदीनुसार बाजार समितीचा कारभार निवडून आलेले संचालक मंडळ, त्यांच्यामधील सभापती, उपसभापती, सदस्य व बाजार समितीचे सचिव अशा संचालक मंडळाकडून केला जातो. बाजार समितीच्या सध्याच्या निवडणूक पद्धतीत कार्यक्षेत्रातील सेवा संस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था सदस्यांकडून ११ व ग्रामपंचायत सदस्यांकडून ४ असे १५ शेतकरी प्रतिनिधी निवडले जातात. शिवाय व्यापारी २ व हमाल, मापाडी १ असे एकूण १८ प्रतिनिधी निवडून दिले जातात. सोसायटी मतदारसंघातील ११ जागांमध्ये सर्वसाधारण ७, महिला राखीव २, इतर मागासवर्गीय १ तर भटक्या जातीजमाती १ अशी विभागणी असते.



मतदार संघ निहाय माहिती पुढीप्रमाणे 


सोसायटी मतदारसंघ : ११ संचालक निवडून द्यावयाचे त्यापैकी सर्वसाधारण ७, महिला राखीव २, इतर मागास प्रवर्ग १, भटक्या विमुक्त जाती-जमाती १.


ग्रामपंचायत मतदारसंघ : ४ संचालक निवडून द्यायचे असून सर्वसाधारण २, अनुसूचित जाती जमाती १, आर्थिक दुर्बल १.


व्यापारी अडते मतदारसंघ : २ संचालक निवडून द्यायचे आहेत. 


हमाल मापाडी मतदार संघ : १ संचालक निवडून द्यायचा आहे. एकूण १८ संचालक निवडून द्यायचे आहेत. सोसायटी व ग्रामपंचायतीमधील शेतकरी सदस्य सदर निवडणूक लढवू शकतात.




गट निहाय मतदान पुढीप्रमाणे 


११ जागासाठी विविध कार्यकारी सोसायटी गट १ हजार ६३४ मतदान


४ जगासाठी ग्रामपंचायत गट १ हजार १८७ मतदान


२ जगासाठी व्यापारी व आडते गट ८२ मतदान


१  हमाल मापाडी गट ३९ मतदान


असे १८ जगासाठी एकूण २ हजार ९४२ मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत.




उमेदवारांसाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे 



उमेदवारी अर्ज / नामनिर्देशन पत्र सोबत उमेदवार व सुचक यांचा पासपोर्ट आकाराचा एक फोटो. (सर्व मतदार संघासाठी), उमेदवार/सुचक / अनुमोदक यांचे स्वयंसाक्षांकित आधार कार्ड झेरॉक्स प्रत, उमेदवाराचे वय वर्षे 21 पुर्ण असलेबाबत जन्मतारखेचा पूरावा, उमेदवार बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात राहत असलेबाबत गाव कामगार तलाठी यांचा रहिवाशी दाखला, उमेदवाराचे कृ.उ.बा.स. यांचे बेबाकी प्रमाणपत्र, बहुउद्देशीय विकास संस्था, ग्रामपंचायत मतदार संघातील निवडावयाच्या सर्व (एकुण 15) जागाकरिता शेतकरी असलेबाबत गावकामगार तलाठी यांचा दाखला तसेच दिनांक 01/01/2023 नंतरचा 7/12 उतारा जोडणे आवश्यक राहील. (किमान 10 गुंठे क्षेत्र आवश्यक राहील), उमेदवाराचे सक्षम प्राधिकारी यांचे स्वयंसाक्षांकित जात प्रमाणपत्र. (इ.मा.प्रवर्ग, वि.जा.भ.ज. प्रवर्ग, व अनू. जाती जमाती प्रवर्गासाठी), उमेदवाराचे सक्षम प्राधिकारी यांचे स्वयंसाक्षांकित जात वैधता प्रमाणपत्र (इ.मा.प्रवर्ग, वि.जा.भ.ज. प्रवर्ग व अनु. जाती जमाती प्रवर्गासाठी), उमेदवाराचे मा. तहसिलदार यांनी दिलेले आर्थिक दुर्बल घटक असल्याचे प्रमाणपत्र (आर्थिक दुर्बल मतदारसंघासाठी), मतदार संघाच्या अंतिम मतदार यादीमध्ये नांव असलेल्या आणि पात्र असलेल्या मतदारास, निवडणुकीसाठी त्याच मतदार संघात फक्त एका नामनिर्देशन पत्रावर सुचक किंवा अनुमोदक होता येईल/ स्वाक्षरी करता येईल,उमेदवार महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) नियम 1967, महाराष्ट्र कृषि बाजार समित्या (समितीची निवडणुक) नियम 2017 व बाजार समितीचे मंजुर उपविधीमध्ये नमुद केलेनुसार पात्रता धारण करीत असावा.



शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार देण्यावरून मतभेद


दर पाच वर्षांनी बाजार समितीमध्ये निवडणूका घेतल्या जातात. बाजार समितीचे सभापती, उपसभापती अशांची निवड याद्वारे केली जाते. पणन कायदा १९६३ मध्ये राज्यात अस्तित्वात आला तेव्हापासून संबंधित बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या ग्राम पंचायतींचे सदस्य आणि सेवा सहकारी सोसायट्यांचे सदस्य हे मतदार होते. शेतकर्‍यांना थेट मतदान करता येत नाही. तेव्हा शेतकर्‍यांना हा मतदानाचा अधिक मिळावा, यासाठी फडणवीस सरकारच्या कार्यकाळात २०१७ मध्ये पणन कायद्यात मोठा बदल केला. शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. बाजार समिती कायद्यातील सुधारणेनुसार समितीच्या बाजार क्षेत्रातील किमान दहा गुंठे जमीन ज्याच्याकडे आहे आणि पाच वर्षांत किमान तीन वेळा शेतमालाची विक्री संबंधित बाजार समितीमध्ये केली असेल अशा शेतकर्‍यांना मतदानासाठी पात्र ठरवण्यात आलं. २०१९ ला सरकार बदललं. महविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर २०२० मध्ये त्यांनी हा कायदा रद्द करून परत आधीची पद्धत आणली गेली.



कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्य


बाजाराच्या आवारात शेतीमाल खरेदी-विक्री व्यवसायासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवणे.

शेतकर्‍यांच्या शेतीमालाविषयी हिताचे संरक्षण करणे.

शेतीमालाची उघड लिलाव पद्धतीने विक्री करणे.

बाजाराच्या आवारात विक्रीस आलेल्या शेतीमालाचे चोख वजनमाप करणे.

शेतक-याना शेतीमाल विक्रीचे २४ तासांत पैसे मिळवून देणे.

विवादाची विनामुल्य तडजोड करणे.

शासनाने निश्चित केलेल्या शेतीमालाच्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी भावात शेती मालाची खरेदी-विक्री व्यवहार होणार नाहीत याची दक्षता घेणे.

शेतीमालाची प्रत व दर्जा वाढविण्यासाठी शेतकर्‍यांना उत्तेजित करणे.

आडतेे/व्यापारी, हमाल, तोलणार, मदतनीस, प्रक्रियाकार यांना परवाने देणे, परवान्यांचे नुतनीकरण करणे, रद्द करणे इ.

बाजार समिती कायदा व नियमातील तरतुदीनुसार परवानाधारक यांच्या हिशोबाच्या नोंदवह्या व अनुषंगिक कागदपत्रांची तपासणी करणे व हिशोब/बिलपट्ट्या प्रमाणित करणे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.