साखरवाडी गणेश पवार
ढवळ तालुका फलटण येथे फलटण -पुसेगाव रस्त्यावर पिकअप गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातामध्ये चालक शौकत दिलावर शेख (वय 60) राहणार हाडको कॉलनी ता फलटण यांचा जागीच मृत्यू झाला असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहितीनुसार, दिनांक 24 मार्च रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास शौकत दिलावर शेख हे पुसेगाव कडून फलटणच्या दिशेने त्यांच्याकडील एम एच 11 B L 53 80 ही पिकअप गाडी घेऊन येत असताना ढवळ येथील हॉटेल सागर जवळ आल्यानंतर त्यांचा गाडीवरील ताबा सुटून गाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. फिर्याद जुबेर लियाकत शेख(वय 30) रा बीबी तालुका फलटण यांनी दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीक्षित करीत आहेत.