साखरवाडी(गणेश पवार)
केंद्र व राज्य सरकारने माढा मतदार संघात विविध विकास कामांसाठी केलेली कोट्यावधी रुपयांच्या तरतुदी बद्दल माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले
फलटण, खंडाळा, माळशिरस, सांगोला या तालुक्यातील जनतेचा कायमस्वरूपी दुष्काळ संपवणारा नीरा देवधर प्रकल्प व त्यास निधी मंजूर केल्याबद्दल तसेच झिरपवाडी येथील हॉस्पिटल निधी , फलटण येथे सेशन कोर्टात मंजुरी व तालुक्यातील अन्य कामासाठी कॅबिनेटमध्ये मंजुरी दिल्याबद्दल आज उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व युवा नेते धनंजय साळुंखे पाटील यांनी मतदार संघातील जनतेच्या वतीने प्रत्यक्ष भेटून आभार व्यक्त केले