Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विडणी येथून 1 वर्षाच्या बालकासह महिला बेपत्ता mahila bepatta

 



 विडणी  -(योगेश निकाळजे)

विडणी ता फलटण येथील अंजली लक्ष्मण मदने ही विवाहिता काल रात्री घरात कोणालाही न सांगता निघून गेली असल्याची घटना घडली आहे.

    या बाबत माहिती अशी विडणी ता.फलटण 24 फाटा,राऊत वस्ती) येथील सौ. अंजली लक्ष्मण मदने(वय -21) ही विवाहीत महिला काल मंगळवार दि.14 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घरात कोणालाही न सांगता आपल्या एक वर्षाच्या मुलासह घरातून बेपत्ता झाल्या आहेत, यावेळी घरातील सर्व मंडळी वस्तीवरील एका कार्यक्रमासाठी गेली होती, घरी आल्यानंतर त्यांना ही घटना समजली त्यानंतर सर्वांनी अंजली व लहान मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते सापडले नाहीत.

      सदर घटनेची नोंद पती लक्ष्मण संताजी मदने यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे. दरम्यान सदर महिला व मुल कोणास सापडल्यास8605953598 व7083304039या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.