साखरवाडी(गणेश पवार)
वडजल ता फलटण येथून दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास येथील 200 केव्ही क्षमतेचा ट्रांसफार्मर चोरी झाल्याची घटना घडली असून फिर्याद वायरमन सुहास दिगंबर बनकर यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून तिथून मिळालेली अधिक माहिती अशी वडजल येथील दूध सागर नामक ट्रान्सफार्मर दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने 5000 रुपये किंमतीचे 350 लिटर ऑइल सांडून ट्रान्सफार्मर मधील 120 किलो वजनाची 35 हजार रुपये किमतीची कॉपर वायर चोरून नेली असल्याचे म्हटले आहे पुढील तपास पोलीस नाईक काशीद करीत आहेत.
फलटण तालुक्यातून मागील 3 ते 4 महिन्यांपासून ट्रान्सफार्मर चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर ट्रान्सफर्मर चोरी झाल्याने शेतकऱ्यांसमोर नवीनच संकट उभे राहिले आहे.