साखरवाडी गणेश पवार
गिरवी ता. फलटण येथे जमिनीची मोजणी करण्याच्या वादातून काठीने मारहाण केल्याची घटना घडली असून गुन्ह्याची फिर्याद विनायक परशुराम कदम (वय 24) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून संशयित लक्ष्मण खाशाबा कदम, अर्चित लक्ष्मण कदम व स्वाती लक्ष्मण कदम यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून तिथून मिळालेली अधिक माहिती अशी फिर्यादी व त्यांचे वडील जमिनी गट नंबर 1012 या ठिकाणी मोजणी करण्याकरता गेले असता त्या ठिकाणी लक्ष्मण कदम व अर्चित कदम यांनी येऊन ही आमची जमीन आहे या ठिकाणी मोजणी करायची नाही असे म्हणत शिवीगाळ ,दमदाटी करून काठीने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खाडे करीत आहेत.