साखरवाडी(गणेश पवार)
लोणंद पोलीस ठाणे हद्दीत बसस्टॅण्ड लोणंद येथे महीला बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेवुन वृध्द महीलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केलेबाबत लोणंद पोलीस ठाणेत गुन्हे दाखल झाले होते. सदर गुन्ह्यांचे तपासाबाबत वरीष्ठ अधिकारी यांनी सुचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि विशाल वायकर व त्यांचे सहकाऱ्यांनी सदर घडणाऱ्या गुन्हयाबाबत सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विष्लेषनाचे आधारे यातील आरोपींनी गुन्हा करतेवेळी वापरलेली इनोव्हा कार व तीन आरोपी निष्पन्न केले. सदर आरोपीपैकी हौसाबाई नामदेव कांबळे वय ४५ वर्षे रा.उदगीर गांधीनगर ता. उदगीर जि लातूर , हारणाबाई बाबू सकट वय ६५ वर्षे रा.बाहेगावरोड, आनंदनगर, देगणूर ता.देगणूर जि. नांदेड व नरसिंग कोंडीबा बन वय ३८ वर्षे, रा. उदगीर गांधीनगर ता.उदगिर जि.लातूर हे तीन आरोपी असुन यातील दोन महिला या उदगीर, लातूर येथून इनोव्हा कारमधुन येवुन त्यांनी लोणंद तसचे वाई, औरंगाबाद (ग्रा) .कवठे महाकाळ (सांगली), सांगली शहर, नाशिक, ओतुर (पुणे), लोणीकंद (पुणे) या पोलीस ठाणे हददीतील एकुण १६ चोरीचे गुन्हे केलेचे निष्पन्न झालेले आहे. सदर महीला आरोपींची पोलीस कोठडी घेवुन आरोपींकडुन चोरी केलेले एकुण १० तोळे सोन्याचे दागिने, व इनोव्हा कार असा एकुण १५,४०,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी लोणंद पोलीस ठाणे हद्दीत तसेच इतर जिल्हयातील केलेल्या सोळा गुन्हयाची कबुली दिली आहे.
सदर गुन्हयाचा तपास साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख, मा.अप्पर पोलीस अधीक्षक बापु बांगर, उपविभागीय पोलीस अधीकारी फलटण तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर, पोउनि. गणेश माने, मपोउपनि पवार, पो.हवा. संतोष नाळे, अतुल कुमार, पो.ना. श्रीनाथ कदम, सर्जेराव सुळ, अमोल पवार, फैय्याज शेख, अभिजित घनवट, अविनाश शिंदे, केतन लाळगे, प्रमोद क्षीरसागर, चालक विजय शिंदे, विठ्ठल काळे, प्रिया दुरगुडे, अश्विनी माने, तसेच उदगीर पो.स्टे. लातुर कडील पोलीस अंमलदार पुलेवाड यांनी कारवाई केली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधिक्षक समीर शेख व बापु बांगर अपर पोलीस अधिक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.