विडणी(बौद्धनगर) ता. फलटण येथील संघमित्र तरुण मंडळाच्यावतीने तक्षशिला बुद्धविहारात माता भिमाई रामजी आंबेडकर यांची 169 वी जयंती साजरी करण्यात आली, यावेळी सामुदायिक बुद्धवंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला तत्पूर्वी लक्ष्मी महिला ग्रामीण पतसंस्थेच्या चेअरमन डॉ. सुचिता शेंडे यांच्या हस्ते माता भिमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
यावेळी प्रसिद्ध साहित्यिक तानाजी जगताप यांनी माता भिमाई यांचा जीवनचरित्रावरील सविस्तर माहिती सांगितली,उपस्थितांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष कैलास जगताप यांनी केले तर कार्यक्रमास नूतन ग्रामपंचायत सदस्या सौ.नम्रता निकाळजे,सुशांत जगताप, सागर जगताप ,विशाल जगताप, पांडूरंग जगताप मुरलीधर जगताप,संदिप गुजले तसेच बौद्धनगरमधील उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.