Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सुरवडीतील विकास कामांसाठी खा रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडून 40 लाखांचा निधी मंजूर-जितेंद्र साळुंखे पाटील vikas kame

 


साखरवाडी (गणेश पवार)

       

      माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून सुरवडी गावातील अंतर्गत रस्ते व गटारांसाठी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे व या रस्त्यांचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे सुरवडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच जितेंद्र साळुंखे पाटील यांनी सांगितले.   

 सुरवडी गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी 20 लाख व गटारांच्या कामासाठी 20 लाख रुपयांच्या निधीची तरतूद खासदारांनी केली असून त्याबद्दल

 सुरवडी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य,ग्रामस्थ यांच्यावतीने  खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे सरपंच शरयू साळुंखे पाटील व उपसरपंच विजय खवळे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.