विडणी -(योगेश निकाळजे)
विडणी ता फलटण येथील श्री.उत्तरेश्वर मंदिरात महाशिवरात्रीउत्सवा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विडणी ता.फलटण या गावाचे आराध्य दैवत असणारे श्री.उत्तरेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीउत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार दि.17 रोजी सकाळी 7.30 वाजता शिवलीला पारायण सोहळा आरंभ करण्यात आला असून हा पारायण सोहळा रविवारपर्यंत सुरू राहणार आहे तसेच रात्री 9 ते11वाजता मन मंदिरा झी टॉकीज वरिष्ठ मार्गदर्शक गजर किर्तनाचा ह.भ.प.पुरुषोत्तमदादा महाराज पाटील यांचा किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
शनिवार दि.18 रोजी सकाळी 7 वाजता श्रींची आरती व सकाळी11 ते 4 वाजता गावातील भजनी मंडळांचा हरिनाम जागर होणार असून यामध्ये उत्तरेश्वर भजनी मंडळ, महादेव भजनी मंडळ, इंगळे कदम भजनी मंडळ, हनुमान भजनी मंडळ,दहाबिघे, सोनवडी भजनी मंडळ, माऊली भजन मंडळ, बागेचामळा इत्यादी भजनी मंडळ सहभागी होणार आहेत, सायंकाळी 7 वाजता श्रींची आरती रात्री10 ते 12.30 वाजेपर्यंत झी टॉकीज फेम ह.भ.प. हनुमंत महाराज मारकड, करमाळा यांचे किर्तन होणार आहे, रात्री11 वा.लघु रुद्र अभिषेक व ठिक.12.35 वा.बेल व पुष्पवृष्टी होईल तर रात्री1ते 2.30 वा.होमहवन विधी होणार आहे.
रविवार दि.19 रोजी सकाळी8.30 वाजता शिवलीला पारायण समाप्ती होणार असून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे तरी या कार्यक्रमांचा सर्व भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.