विडणी(योगेश निकाळजे) - विडणी गावचे माजी सरपंच व राजेगटाचे कट्टर समर्थक शरद कोल्हे,सुनिल नाळे यांच्यासह धुळदेव येथील अनेक कार्यकर्त्यानी राष्ट्रवादीला निरोप देऊन भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे विडणी गावचे माजी उपसरपंच व राष्ट्रवादी पक्षाचे कट्टर समर्थक असणारे शरद कोल्हे व सुनिल नाळे यांनी विडणी व धुळदेव येथील त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह मा.खा.रणजितसिंह निंबाळकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, विडणीचे सरपंच सागर अभंग भाजप तालुकाध्यक्ष बापूराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळदेव (कर्णेवस्ती) येथे झालेल्या कार्यक्रमात भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी शरद कोल्हे, सुनिल नाळे यांच्यासह धुळदेव येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माणिकराव कर्णे, जालिंदर भिवरकर,बबनराव कर्णे,वैभव कर्णे, विशाल जाधव, संकेत भुजबळ, प्रशांत नांदले,अतूल ठोंबरे , दादासाहेब नवले,अक्षय अब्दागिरे यांच्यासह राजेगटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.फलटण तालुक्यात सध्या राष्ट्रवादीमधील (राजेगटाच्या) अनेक विश्वासू युवा व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा भाजपपक्षात जाहीर प्रवेश होत असल्याने आता भाजपकडे जाणार हा लोंढा कसा थांबावयाचा हा गहन प्रश्न राष्ट्रवादीच्या राजेगटाला पडला असल्याचे दिसून येत आहे.