फलटण चौफेर दि १८ जुलै २०२५
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद फलटण तालुका अध्यक्ष, गुणवरे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य, तसेच जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश तुकाराम आढाव (वय ६३) यांचे गुरुवारी रात्री नागपूर येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
प्रा. आढाव हे पत्रकारितेतील आपला ठसा उमटविणारे, सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहिलेले व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने फलटण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचे पार्थिव शनिवार दिनांक १९ जुलै रोजी सकाळी ७ वाजता त्यांच्या मूळ गावी गुणवरे (ता. फलटण) येथील ग्रामपंचायत कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा तेथून निघेल व गुणवरे येथील त्यांच्या शेतातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व आप्तस्वकीय असा परिवार आहे.त्यांच्या निधनामुळे फलटण तालुक्यात पत्रकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व आप्तस्वकीय असा परिवार आहे.त्यांच्या निधनामुळे फलटण तालुक्यात पत्रकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.