फलटण चौफेर दि 19 जुलै 2025
फलटण-पंढरपूर रस्त्यावर श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. इर्टीगा व पिकअप गाडीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत इर्टीगा चालक जागीच ठार झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत फलटण शहर पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी,दि 18 जुलै रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडला. अभिजीत रामभाऊ मोरे (वय 23, रा. झिरपवाडी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे ते इर्टीगा (MH 46 BE 5984) गाडी घेऊन फलटण कडे येत असताना पिंपरद कडून फलटण कडे येत असलेल्या महिंद्रा पिकअप (MH 11 DD 6456) गाडीला त्यांनी जोरदार धडक दिली.या धडकेत पिकअप गाडीवरील चालक आदित्य विनोद भोईटे (वय 21, रा. पिंपरद) याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. फिर्यादी रोहन आप्पासाहेब कापसे (वय 20, रा. पिंपरद) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. तसेच इर्टीगामधील प्रसाद उर्फ चिकु राजेंद्र मोरे (वय 23, रा. झिरपवाडी) हा देखील गंभीर जखमी झाला आहे.या अपघातात चालक अभिजीत मोरे याचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात भा.दं.वि कलम 106(1), 281, 125(a)(b), 324(4)(5) व मोटार वाहन अधिनियम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला पोलीस उपनिरीक्षक विजयमाला गाजरे करीत आहेत.