साखरवाडी पुढारी वृत्तसेवा
साखरवाडी ता फलटण येथील साखरवाडी विद्यालयाच्या माध्यमिक विभागातील इयत्ता ८ वीमध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी स्वरांजली महेश गायवकवाड हिने शिष्यवृत्ती परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत असताना स्वरांजलीने आपल्या अभ्यासातील सातत्य, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवले. तिच्या यशामागे शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे प्रोत्साहन आणि तिच्या मेहनतीची मोठी भूमिका आहे.स्वरांजलीच्या या यशाबद्दल साखरवाडी विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी, शिक्षकवृंदांनी, पालकांनी तसेच ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले.