फलटण चौफेर दि २६ जुलै २०२५
फलटण तालुक्यातील साखरवाडी विद्यालय येथे राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त "एक विद्यार्थी एक वृक्ष" या अभियानांतर्गत ६६ हजार लक्ष्मीतरू रोपण करण्याच्या भव्य संकल्पाचा शुभारंभ आमदार सचिन पाटील यांच्या शुभहस्ते झाला.
यावेळी बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले की, “झाडे लावा झाडे जगवा” हे ब्रीदवाक्य फक्त बोलण्यापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. लक्ष्मीतरू वृक्ष मानवी आरोग्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. आज पर्यावरणातील असंतुलनामुळे मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहेत. त्यामुळे फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल साधणे आवश्यक आहे.तसेच त्यांनी सांगितले की, आगामी काळात जिल्हा परिषदेच्या शाळांमार्फत सर्वत्र वृक्षारोपण मोहिमा राबवून फलटण तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी सर्वच वर्गातील लोकांनी पुढे यावे.
या प्रसंगी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, महानंदाचे माजी उपाध्यक्ष डी के पवार साखरवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धनंजय साळुंखे पाटील, आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ. माधवराव पोळ, महाराष्ट्र राज्य वृक्ष लागवड व संगोपन समितीचे अध्यक्ष प्रभाकर जगताप, माजी पंचायत समिती सदस्य सागर कांबळे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष सौ. प्रतिभाताई शिंदे, युवा नेते विक्रमआप्पा भोसले, साखरवाडी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. जगदाळे मॅडम, संचालक राजेंद्र शेवाळे, युवा नेते निवृत्ती खताळ सर, राजाभाऊ पवार, डॉ. ओंकार सरगर तसेच विद्यार्थी व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.