फलटण चौफेर दि २६ जुलै २०२५
लोणंद-नीरा रस्त्यावर आज दुपारी सव्वादोनच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका भरधाव क्रेनने दुचाकीवरील महिलेस चिरडल्याने ती जागीच ठार झाली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, लोणंद बसस्थानकापासून काही मीटर अंतरावर गर्दीच्या रस्त्यावरून जात असताना भरधाव क्रेनने दुचाकीवरील महिलेस सुमारे 20 ते 25 फूट फरपटत नेले. यात ती गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाली. अपघातानंतरचे विदारक दृश्य पाहून अनेकजण हदरले. ठार झालेली महिला पुरंदर तालुक्यातील दौंडज येथील असल्याचे समजते.लोणंदमधून ही क्रेन कायमच भरधाव वेगात जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. चालकावर आधीच कारवाई करण्यात आली असती तर हा अपघात टळला असता, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. या अपघातानंतर चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.